धरणगाव येथे नाभिक महामंडळाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सोनवणे यांचे स्वागत

धरणगाव, प्रतिनिधी । नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांनी धरणगाव येथे महेश निकम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी नाभिक बांधवांनी पारंपारिक व्यवसाया सोबत जोड व्यवसाय करण्याचा मोलाचा सल्ला दिला.

 

नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांचा समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धरणगाव येथील महिला पदाधिकारी प्रीती महेश निकम,जळगाव जिल्हा नाभिक महामंडळ उप संघटक,तथा समाज अध्यक्ष सतीश बोरसे,  सोनवणे साहेब, जेष्ठ समाज सेवक मधुकर निकम, युवा सेनेचे शहर अध्यक्ष कमलेश बोरसे, प्रवीण निकम, चंद्रकांत फुलपगार, दिगम्बर निकम, यांनी भारती सोनवणे यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

पाल्यांना शिक्षण देवून उद्याचा आदर्श नागरिक घडवा : भारती सोनवणे 

भारती सोनवणे यांनी  धरणगाव शहरात समाज विषयी सर्व माहिती जाणून घेतली.  यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,  नाभिक समाज बांधव यांनी नुसते आपला व्यवसाय न करता त्यासोबत काही जोड व्यवसाय सुद्धा करावा जेणे करून कोरोना सारखा महाभयंकर आजाराची तिसरी लाट जर आली तर परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी सलून व्यवसाय सोबत असलेल्या जोड व्यवसायाचा फायदा होऊ शकतो. सर्व समाज बांधव यांनी उद्योग आधार नोंदणी करणे सुद्धा आवश्यक असून भविष्यात व्यवसायाची शासन दरबारी नोंद असली की कुठलाही फायदा होऊ शकतो. सर्व समाज बांधव यांनी आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन उद्याचा आदर्श नागरिक घडवावे व त्यांच्या हातून समाजाची,राज्य,व राष्ट्र ची चांगली सेवा होईल असे चांगले कार्य आपल्या पाल्यांना करायला लावणे सुद्धा जरुरीचे आहे.

Protected Content