धरणगाव प्रतिनिधी । दूधाची भाववाढ करावी आणि अन्य मागण्यांसाठी आज भाजपतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणगाव येथे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. यात पक्षाचे वरिष्ठ नेते पी. सी. पाटील, तालुकाध्यक्ष संजय महाजन, चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपातर्फे काही दिवसांपूर्वी दुध उत्पादकांना शासनाने १० रुपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रु. अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्याने भाजपातर्फे राज्यव्यापी एल्गार आंदोलन करून निवेदन देण्यात करण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, गेल्या चार महिन्यापासून कोरोना महामारीमुळे शासनाच्या गोंधळलेल्या भुमिकेमुळे महाराष्ट्रातील जनता अतिशय त्रस्त झाली आहे. आज कोणताही वर्ग मोलमजुर, शेतमजुर, शेतकरी, व्यापारी, हात विक्रेते, व्यावसायिक, कारखानदार शासनाच्या बाबतीत समाधानी नाही. त्यात शेतकऱ्यांची व दुध उत्पादकांची खूप मोठी थट्टा शासनाकडून होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा युरिया व रासायनिक खते, वीज बिल,मका खरेदीच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी आजचे हे एल्गार आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/306861923794494