Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव बाजार समितीवर महायुतीच्या पॅनलचे १८ पैकी १२ जागांवर विजय (व्हिडीओ)

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या मतमोजणीत शिवसेना-भाजप तसेच संजय पवार यांच्या गटाच्या सहकार पॅनलने विजय संपादन केला आहे. या माध्यमातून पालकमंत्र्यांना धरणगावात मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणूकीत महायुतीच्या सहकार पॅनलचे एकुण १८ पैकी १२ जागांवर आपले स्पष्ट बहुमत सिध्द केले आहे.

विजयी उमेदवारांची नावे आणि कंसात मिळालेली मते !
सोसायटी मतदार संघातून –चौधरी सुरेश सीताराम (५५५), पवार सुनील दत्तात्रय (५३२), पाटील सुदाम शेनपडू (५१७), पाटील जिजाबराव गिरधर (५१५),पाटील किरण शांताराम (५०६), पाटील रघुनाथ धुडकू (५०७), पाटील रंगराव दोधू (५०३) ; महिला राखीव – पाटील लताबाई गजानन (५१९) आणि पाटील रेखाबाई ईश्वर (४९७) ; ओबीसी मतदार संघातून – पाटील रमेश माणिक (६२८); एनटी संवर्ग मतदार संघातून – धनगर दिलीपराव उत्तमराव (५७७); ग्रामपंचायत सर्वसाधारण – चौधरी सुरेखा देविदास (४८५) आणि पाटील रवींद्र भिलाजी (४४१); एससी संवर्ग – पवार संजय जुलाल (५०३); आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – पाटील प्रेमराज परशुराम (४९०); व्यापारी मतदार संघ – कर्वा नितीन नंदलाल (१५३) आणि काबरे संजय रमेश (१४४); हमाल मापाडी मतदार संघ – माळी ज्ञानेश्वर वसंत (१९९) यांनी विजय मिळविला.

Exit mobile version