Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुक्यात पुन्हा २ कोरोना बाधित रुग्ण आढळले

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा २ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील १ तर पाळधी खुर्द येथील एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात तब्बल १२ रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यात पुन्हा २ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील धरणी परिसर तर पाळधी खुर्द येथील एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात तब्बल १२ रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १७९ इतकी झाली आहे. यातील १६ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३६ अहवाल प्रलंबित आहेत.

Exit mobile version