Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुक्यात पाच नवीन कोरोना बाधीत

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात आज नवीन पाच कोरोना बाधीत आढळून आले असून यामुळे तालुक्यात या विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

धरणगाव तालुक्यात आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये पाच नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यातील दोन रूग्ण हे धरणगाव शहर तर तीन तालुक्यातील पाळधी येथील आहेत. शहरातील रूग्ण हे मराठे गल्ली आणि धरणी येथील आहे. दरम्यान, या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. संबंधीत रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, आजच्या पाच रूग्णांमुळे तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची संख्या १२७ इतकी झाली आहे.

Exit mobile version