Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुक्यात आज ३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह !

धरणगाव (प्रतिनिधी) आज सकाळी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात आज पुन्हा ३ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील २ तर एकलग्न येथील एका रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज सकाळी १६ कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

आज सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यात पुन्हा ३ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील नवेगाव आणि महात्मा फुले नगरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच एकलग्न येथे देखील एका आढळून आला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात लवकरच फवारणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १९४ इतकी झाली आहे. यातील १६ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Exit mobile version