Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांना कॉंग्रेस घालणार घेराव !

धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी म्हणून सोमवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे घेराव घालून आंदोलन करण्यात येणार आहे येणार आहे. धरणगाव तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष चंदन पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.

 

शेतकऱ्यांना कृषीकेंद्र युरिया व इतर खते उपलब्ध करून देत नाही आहे व खतांच्या किमती सुद्धा एमआरपी पेक्षा जास्त लावत आहे शेतकऱ्यांची पिळवणूक फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या गंभीर मुद्दयाकडे तालुका कृषी अधिकारी कोणत्याही प्रकारे लक्ष द्यायला तयार नाही. त्यासंबंधी त्यांना जाब विचारण्यासाठी सोमवार रोजी कृषी विभाग ऑफिस येथे धरणगाव काँग्रेसतर्फे अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चंदन पाटील (9423976566) यांनी केली आहे.

Exit mobile version