Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात २२ रूग्णांची कोरोनावर मात; पेढे भरवून केले स्वागत

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरमधून आज २२ रूग्ण बरे होवून कोरोनामुक्त झाले असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. सर्वांना पेढा भरवून व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसैनिक विलास महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार नितीन कुमार देवरे, शिवसेनेचे गटनेते पप्पु भावे, भाजपा गटनेते कैलास माळी यांच्यासह मान्यवरांनी कोरोनामुक्त रूग्णा पेढे भरवून स्वागत केले.

गेल्या आठवड्यापासून धरणगाव कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले २२ रूग्ण आज बरे झाले असून त्यांना कोरोनामुक्त घोषीत करण्यात आले आहे. कोरोनावर यशस्विरित्या मात करणाऱ्या रूग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. तर पेढे भरवून व गुलाबपुष्प देवून अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसैनिक विलास महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार नितीन कुमार देवरे, शिवसेनेचे गटनेते पप्पु भावे, भाजपा गटनेते कैलास माळी, शिवसेना शहर संघटक धिरेंद्र पुरभे यांची उपस्थिती होती.

कोविड सेंटर ची सक्षमपणे जबाबदारी संभाळणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांचा वाणी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महेश अमृतकर (लक्ष्मी मेडिकल), ललित येवले, डॉ.पंकज अमृतकर, डॉ.मनोज अमृतकर, प्रतिक अमृतकर आदी वाणी समाजबांधव, मंडळाधिकारी अधिकारी वनराज पाटील, तलाठी अनिल सुरवाडे, कोतवाल तबरेज खाटीक, अरविंद चौधरी, गोपाल पाटील, गोपाल चौधरी, निनाद कापुरे, अमोल चौधरी आदी उपस्थित होते.

Exit mobile version