Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटीलांचा आज भव्य नागरी सत्कार

gulabrav patil 11

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुका महाविकास आघाडीतर्फे धरणगाव येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन आज सायंकाळी ७.३० येथील साने पटांगण, कोट बाजार येथे होणार आहे.

यांचाही होणार सत्कार
धरणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निलेश चौधरी, पंचायत समिती सभापतीपदी मुकुंद नन्नवरे, उपसभापतीपदी शारदाताई प्रेमराज पाटील, जळगाव पंचायत समिती सभापतीपदी नंदलाल पाटील, उपसभापतीपदी संगिताताई चिंचोरे यांची निवड झाल्याबद्दल या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा ही सत्कार समारंभ करण्यात आला.

यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, प्रमुख अतिथी म्हणून आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लताताई सोनवणे, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर या भव्य नागरी सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन धरणगाव तालुका महाविकास आघाडीचा पदाधिकारी यांनी केले आहे.

 

Exit mobile version