Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात जलदूत फाऊंडेशतर्फे पुरातन विहीरीचे गाळ काढण्याचा शुभारंभ

धरणगाव प्रतिनिधी । माजी विद्यार्थ्यांना स्थापन केलेल्या जलदूत फाऊंडेशनतर्फे चोपडा रोडवरील महादेव मंदीराजवळील पुरातन कालीन पायविहीरीचा गाळ काढण्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.

गेल्यावर्षीही केला उपक्रम
धरणागाव शहरातील माजी विद्यार्थांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या जलदूत फाऊंडेशनतर्फे मागच्या वर्षी शिवाजी तलावाचे गाळ काढण्याचे तसेच नाला खोलीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर यावर्षी चोपडा रोडवरील महादेव मंदिरा जवळील पुरातन कालीन पायविहिरीचा संपूर्ण गाळ काढून विहीर स्वच्छ करण्याच्या कामाचा शुभारंभ आज
१६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता झाला.

याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, सर्व नगरसेवक, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, भाटीया समाज मंडळाचे अध्यक्ष मंगलदास भाटिया, सचिव प्रशांत दुतिया व पदाधिकारी, धरणगाव अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमलाल भाटीया व संचालक मंडळ, गोटुशेठ काबरा, प. रा. हायस्कुल सोसायटीचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष निलेश चौधरी, मोहीत पवार, पत्रकार भगीरथ माळी, अर्बन बँकेचे गुजराथी, भोई, भामरे, वानखेडे, प्रा. एम. यु. पाटील सर, अवधेश बाचपेई, कंत्राटदार शेखर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, सदर कार्यक्रमासाठी जलदूत फाउंडेशनतर्फे कन्हया रायपूरकर, योगेश भाटीया, डॉ. सुचित जैन, डॉ. पंकज अमृतकर, प्रा. डॉ. दिपक साळुंखे, डॉ. आशिष सुर्यवंशी, नितेश माळी, इंजि. सुनिल शाह, प्रा. किरण पाटील, विक्रांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version