Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचार सुरू असलेल्या महिलेचा आज मृत्यू झाला असून तिच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये धरणगाव तालुक्यात तीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असल्याने चिंता वाढली असतांना कोरोनामुळे उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला शहरातील कुंभारवाडा परिसरातील रहिवासी असून तिच्यावर जळगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासनाच्या निर्देशांचे पालन करत अंत्यसंस्कार करण्यात आले. धरणगाव तालुक्यात आतापर्यंत १०४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यातील ९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

Exit mobile version