Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात आढळला पुन्हा एक कोरोना बाधीत

धरणगाव प्रतिनिधी । रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील भडंगपुरा भागातील एक रहिवासी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे.

धरणगावात रविवारी तीन कोरोना संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यातील एका महिलेचा पत्ता बराच वेळ आढळून येत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती. काही तासांनी ही महिला तालुक्यातील चोरगाव येथील रहिवासी असल्याचे आढळून आल्यामुळे हा गोंधळा थांबला होता. यानंतर रात्री उशीरा शहरातील भडंगपुरा भागातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संबंधीत व्यक्तीचा रहिवास असणार्‍या परिसरात फवारणी करण्यात आली असून हा परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.

Exit mobile version