Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावातून दोन दुचाकी लंपास

धरणगाव, प्रतिनिधी । येथील चिंतामण मोरया परिसरातून घरासमोर लावलेल्या दोन मोटार सायकल चोरटयांनी काल मध्यरात्रीनंतर लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धरणगाव येथील चिंतामण मोरया परिसरातून श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून रविवार १९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेनंतर दोन मोटार सायकली घराच्या अंगणातून चोरून नेली. यात विनोद चौधरी यांची मोटार सायकल क्र. एमएच १९ ७१७९ व लाइव्ह ट्रेंड्स न्यूजचे प्रतिनिधी कल्पेश महाजन यांची गाडी क्र. एमएच १९ २१३४ चोरून नेली. याबाबत त्यांनी आज सकाळी धरणगाव पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version