Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावातील ‘त्या’ नगरपालिका कर्मचार्‍याची पत्नी व मुलगीही पॉझिटीव्ह

धरणगाव प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचा दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या नगरपालिका कर्मचार्‍याची पत्नी आणि मुलगी देखील कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट आज आला असून निवासी नायब तहसीलदारांनी याला दुजोरा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, परवा धरणगाव नगरपालिकेत कार्यरत असणारा ३० वर्षाचा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या रूग्णाचे कुटुंबिय आणि संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज यातील संबंधीत रूग्णाची पत्नी आणि मुलगी हे दोन कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले आहे. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज दुपारी शहरातील एक व्यापारी कोरोना बाधीत आढळून आल्यानंतर आता त्या कर्मचार्‍याची पत्नी व मुलगी पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version