Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धमकी देणार्‍याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेश फेगडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार तथा खासदार हरिभाऊ जावळे यांना राजेंद्र पवार वेंकटेश नगर हरिविठ्ठल रोड जळगाव या नामक इसमाने मोबाईल वरून संदेश पाठवत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना राजेंद्र पवार नामक व्यक्तीच्या मोबाईल वरून संदेश पाठवत जिवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने या इसमाचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच याच इसमाने यावल नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांना देखील गेल्या तीन ते चार दिवसापूर्वीच व्हाट्सअप वर मेसेज पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत यावल पोलीस स्टेशनला राकेश कोलते यांनी तक्रार दिल्यावरून या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे अशाचप्रकारे जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने कार्यकर्त्यांचा व पदाधिकार्‍यांचा संताप अनावर झाला असून याबाबत भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात त्यांनी आज यावल चे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची भेट घेऊन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना धमकी देणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Exit mobile version