Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनुष व सारंग तोफांचे यशस्वी परीक्षण

tofa

जबलपूर वृत्तसंस्था । धनुष आणि सारंग या तोफांचे आज जबलपूर जवळ यशस्वी परीक्षण करण्यात आले असून यांना लष्करात लवकरच तैनात करण्यात येणार आहेत.

जबलपूर शहराजवळ असणार्‍या खमारियाच्या एलपीआर येथे धनुष आणि सारंग या तोफांची चाचणी घेण्यात आली आहे. धनुष आणि सारंग या देशातील सर्वात शक्तिशाली आणि आधुनिक तोफा आहेत. या चाचणी प्रसंगी एसक्यूएचे डीजी लेफ्टनंट जनरल संजय चौहान हे विशेष उपस्थित होते. या आधुनिक तोफांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रात्रीच्या अंधारातही अचूक लक्ष्यांवर विजय मिळवू शकतात. आतापर्यंत आठ तोफा सैन्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. सारंग तोफांची पहिली यशस्वी चाचणी २१ जानेवारी रोजी झाली. यानंतर आता जबलपूर येथे याला यशस्वीपणे वापरण्यात आले. लवकरच या तोफा सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.

Exit mobile version