Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनगर समाज संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी संदीप सावळे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाचे युवा नेते संदीप सावळे यांची धनगर समाज संघर्ष समितीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्यसभा खासदार विकास जी महात्मे यांच्या शिफारसीनुसार धनगर समाज संघर्ष समितीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी संदीप सावळे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप सावळे यांनी धनगर समाज आरक्षणाच्या चळवळीत किंवा मेंढपाळांच्या चरही पासेस संदर्भात  मोठे आंदोलन केलेले आहेत. व त्याचबरोबर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आंदोलनामध्ये मध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेऊन आज पर्यंत काम केला आहे.

 

महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असून आज त्यांच्यावर ते धनगर समाज संघर्ष समितीची धुरा देण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे ,माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, सुरेश  धनके, धनगर समाज संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे  यांच्यासह मान्यवर तसेच समाजबांधवांनी सावळे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

Exit mobile version