Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनगर आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात मांडा ; आमदार चिमणराव पाटलांना शिष्टमंडळ भेटले

पारोळा प्रतिनिधी  । धनगर समाज गेल्या ७० वर्षापासून आरक्षणाबाबत मागणी सरकार दरबारी मांडत आहे. परंतु सरकार त्यांच्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशा मागणीचे निवेदन धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे आमदार चिमणराव पाटील यांना देण्यात आले. 

 

आमदार चिमणराव पाटील यांना  धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे  युवा मल्हार सेनेचे समाधान धनगर, देवा लांडगे, नाना धनगर, आप्पा धनगर, सागर हाटकर, प्रविण हाटकर, बापू गढरी, सुनिल धनगर, भारत हाटकर आदींनी निवेदन देवून पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे आरक्षण प्रश्न सभागृहात मांडवा अशी अपेक्षा व्यक्त केली. निवेदन करण्यात आलेल्या मागण्य पुढील प्रमाणे : धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न सभागृहात मांडावा.,आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना १ हजार कोटींचा धनगर समाजाला त्वरित उपलब्ध करून लागू करावेत., न्यायालयात याचिका क्र.४९१९/२०१७ अन्वये दाखल आहे जलद गतीने न्यायालयाने चालवावे व त्वरित सुनावणी व्हावी., सदरील याचिकेवर खर्च सरकारने उचलावा व आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर भव्य स्मारक तालुक्यांमध्ये उभे करावेत.

Exit mobile version