Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला असून यात त्यांना किरकोळ मार लागल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली. या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे. धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे, अशी माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.

Exit mobile version