Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : सहा वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ६ वर्षीय मुलावर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ६ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या सुमारास मुलगा घरी असतांना संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याने मुलाला जवळ बोलावून नविन बॉल घेण्यासाठी २० रूपये देतो असे सांगून त्याच्या घरात घेवून गेला व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाच्या घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याच्यावर बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमरा दळवी करीत आहे.

 

Exit mobile version