Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक; शिवसेनेचे हभप जळकेकर महाराज यांचा चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठींबा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघात सध्या दररोज रंगतदार घडामोडी घडत असून आजही शिवसेनेचे जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर) महाराज यांनी आज (दि.१२) आपण अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठींबा देत असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्याच्या या भूमीकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या आधी लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर व माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनीही त्यांना पाठींबा दिला आहे. या निमित्ताने जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करीत ज्ञानेश्वर महाराज यांनी आज (दि.१२) आपल्या जिल्हा संघटक पदाचा राजीनामा पक्ष प्रमुखांकडे पाठवला आहे. बाजार समिती संचालक पदी आश्वासन देवूनही नियुक्ती न करण्यात आल्याने आपण राजीनामा देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी माघार घेतल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. लकी टेलर यांच्यासह माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपला पाठींबा अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना दिल्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. या आधी जानकीराम पाटील यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत ना. पाटील यांच्यावर भ्रष्टाचार, शिवसेना संपविल्याचा एवढेच नव्हे, तर मराठा समाजात भांडणं लावण्याचा,असे गंभीर आरोप केले होते.

Exit mobile version