Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून दोन आरोपी पळाले

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून 2 आरोपी पळाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आकाश पवार आणि अर्शद सय्यद अशी पळून गेलेल्या आरोपींची नावं आहेत.

 

पळून गेलेले दोघेही पुणे जिल्ह्यातीलच असून एकजण 307 तर दुसरा 392च्या गुन्ह्यातील आरोपी आहे. येरवडा जेल लॉकडाऊन असल्याने शेजारच्या वसतीगृहात आरोपींना ठेवले जात आहे. मात्र तिथूनच शौचालयाचा बहाना करून आरोपी पळाले. बार्टीच्या मागासवर्गीय वसतीगृहात सध्या बाहेरून येणाऱ्या आरोपींना ठेवले जात आहे. कारण कोरोनामुळे येरवडा जेल लॉकडाऊन आहे. बाहेरच्या आरोपींना जेलमध्ये सध्या परवानगी नाहीय.

Exit mobile version