Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : मोबाईल गेमच्या नादात आणि समोस्यासाठी दोन शाळकरी मुलांची आत्महत्या !

नागपूर (वृत्तसंस्था) मोबाईल गेमच्या नादात आणि समोस्यासाठी वेगवेगळ्या घटनेत दोन शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे.

यातील पहिल्या घटनेतील ११ वर्षीय विरु शाहू (रा. काटोल मार्गावरील गंगानगर) या मुलाने काल समोसा घेण्यासाठी आईकडे हट्ट केला. आईने त्याला दहा रुपये दिल्यानंतर तो समोसा घेऊन आला. समोसा किचनमध्ये ठेवून तो हात-पाय धुण्यासाठी बाथरुममध्ये गेला. मात्र त्याच्या मोठ्या भावाने तो समोसा खाल्ला. त्यामुळे चिडून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत योगेंद्रनगर येथील नर्मदा अपार्टमेंटमध्ये १३ वर्षीय राजवीर ठाकूर या मुलाला गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो एकटाच आपल्या खोलीत मोबाईलवर गेम खेळत मग्न राहायचा. मात्र आज सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यात ओढणीने तयार केलेला फास आणि तो खिडकीला बांधलेला होता.

Exit mobile version