Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : मुंबईत प्रवासी महिलेवर सामुहिक बलात्कार

मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील आपल्या घराकडे निघालेल्या एका प्रवासी महिलेवर ४ जणांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे.

 

प्रवासी महिलेवर सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले यांनी सामुहिक बलात्कार केला. रात्री घडलेल्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

Exit mobile version