धक्कादायक : महिलेचा खून करून फेकला मृतदेह; गोणपाटात आढळली हाडं

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बोढरे शिवारात एका अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेहाचा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणपाटमध्ये टाकून काटेरी झुडूपात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुकयातील कन्नड महामार्ग घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बोढरे शिवारातील क्षेत्र क्रमांक ३१३ मध्ये एका काटेरी झुडपाजवळ एका गोपणाटीत अनोळखी महिलेचे हाडे आढळून आले आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. साधारण दोन महिन्यांपुर्वी या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणपाटीत टाकून काटेरी झुडूपात फेकून दिला. दरम्यान वनपाल दिपक किसन जाधव हे आपल्या पथकासह गस्तीवर असतांना त्यांना हा दिसून आला. घटना उघडकीला आल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेबाबत वनपालक दिपक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहे.

Protected Content