Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक…भरदिवसा घरात घुसून महिलेला मारहाण करत ५ लाखाचा ऐवज लंपास

marhan tayar

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरातमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विवाहितेला अज्ञात तीन जणांनी विवस्त्र करून मारहाण करत प्रॉपर्टीचे कागदपत्र आणि लाखोंची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, काव्यरत्नवाली ते डीमार्ट दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसोबत राहणाऱ्या पिडीत महिला 15 जानेवारी रोजी घरात एकट्या होत्या. दुपारी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्ती आणि एक महिलने घरात घुसून पिडीत महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर हातपाय बांधून विवस्त्र करून पुन्हा बेदम मारहाण केली आणि घरात असलेले प्रॉपर्टीचे कागदपत्र, चार लाखाची रोकड व सोने-चांदीचे दागिने असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. पिडीत महिलेलने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कागदपत्र आणि रोकड घेऊन तिघे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

घटना घडल्यानंतर महिला प्रचंड घाबरलेली होती. सायंकाळी घरी नातेवाईक आल्यानंतर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. दरम्यान, आज सकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी तक्रार नोंदवत पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यानच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेण्याचे काम व पुढील चौकशी सुरू झाली आहे. तर याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गेलेला मुद्धेमाल

4 लाख रुपये रोख, 60 हजार रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याच्या 4 बांगड्या, 15 हजार रुपये किमतीचे 1 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 15 हजार रुपये किमतीचे 6 सोन्याच्या अंगठ्या आणि 300 रुपयाचे प्लॉट खरेदी खत, असे एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे.

Exit mobile version