Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : पारोळ्यात तरूणीवर बलात्कार करून पाजले विष; दोन संशयित अटकेत

पारोळा प्रतिनिधी । शहरातील वीस वर्षीय दलित तरूणीचे अपहरण करत तिच्यावर सामुहिक बलात्कार करून विषारी औषध देवून खून केल्याचा खळबळजनक आरोप मयत तरूणीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील २० वर्षीय दलित तरूणीचे अपहरण झाल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी बेपत्ता तरूणी बसस्थानकाच्या मागे बेशुध्दावस्थेत आढळून आली. काही नागरीकांना तिला बेशुध्दावस्थेत तातडीने धुळे रूग्णालयात हलविण्यात आले. आज पहाटे पिडीत तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुलीवर बलात्कार करून तिला विषारी औषध देण्यात आल्याचा आरोप मुलीच्या मामाने केला आहे. पीडित मुलीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. मेडीकल रिपोर्ट नुसार मुलीवर दोन ते तीन जणांना सामुहिक बलात्कार केला असून पाण्यात विष देवून पाजण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अजून कोणकोण आहे याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version