Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : पतीनेच करायला लावला पत्नीवर बलात्कार !

Rape2 678x381

 

पुणे (वृत्तसंस्था) पतीनेच आपल्या पत्नीवर एकाला बलात्कार करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कात्रज परिसरातील एका होस्टेलवर नोव्हेंबर २०१९ मध्ये पिडीत महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. पिडीत महिलेला नातेवाईकांनी हिंमत दिल्यानंतर तिने फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन शिंदे याला अटक केली आहे.

Exit mobile version