Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक… धरणगावात आज तिसरा कोराना बाधित रूग्ण आढळला

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरला नुकताच संशयित कोरोना रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून चार जणांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यातील डॉक्टरांच्या कुटुंबातील एक आणि मयत झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

धरणगाव तालुक्यात एकुण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. पहिल्या आहवालात सुरूवातीला दोन रूग्ण आढळून आले होते. त्याल तालुक्यातील धानोरा आणि शहरातील लोहारगल्ली याचा समावेश होता. आता नुकताच तिसरा रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून आढळून आलेला रूग्ण शहरातील पारधीवाडा येथील आहे. नायब तहसीलदार नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान शहरात आढळून आलेले दोन रूग्णांच्या वास्तव्यास असलेला परिसर सील करण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Exit mobile version