Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : धरणगावातील ‘त्या’ कोरोनाबाधित महिलेचा पत्ता सापडेना !

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला. परंतू यातील एका 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा पत्ता सापडत नसल्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडत आहे. दरम्यान, ही महिला नेमकी कुठं राहते? याबाबत माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी सांगितले.

 

आज दुपारी साधारण दीड वाजेच्या सुमारास शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल नुकताच तालुका प्रशासनाला प्राप्त झाला होता. यानुसार कोरोनाबाधित तीन रूग्णांपैकी एक शहरातील मोठा माळी वाडा तर दुसरा बालाजी मंदीर परिसरातील आहे. परंतू तिसरा रूग्णाचा पत्ता माहित नसल्यामुळे यंत्रणेची धावपळ उडत आहे. साधारण दोन तास उलटून देखील महिलेचा पत्ता सापडत नसल्यामुळे यंत्रणा कमालीची हैराण झाली आहे. प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

कदाचित स्वॅब देतांना महिलेने संपूर्ण पत्ता न सांगितला नसल्यामुळे हा घोळ निर्माण झाला असेल. अगदी भीती पोटी देखील महिलेने गावाचे नाव चुकीचे सांगितलेले असू शकते किंवा महिलेचे नाव लिहितांना कोविड रुग्णालयातील कर्मचारीने घाई-घाईत संपूर्ण पत्ता लिहिला नसावा. धरणगावात याआधी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. तर शहरात दोन दिवसापूर्वीही तीन रुग्ण आढळले होते. दरम्यान, धरणगाव शहरात आज आढळून आलेल्या महिलेचा कोरोना बाधित महिलेचा पत्ता सापडत नसल्यामुळे यंत्रणेची मोठी धावपळ उडत आहे.

Exit mobile version