Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : धरणगावातील एक व्यापारी कोरोना बाधित !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका व्यापारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल नुकताचा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, हा व्यापारी वास्तव्यास असलेला खत्री गल्ली परिसर सील करण्याचे काम सुरू आहे.

 

धरणगाव तालुका एकीकडे कोरोनामुक्तकडे वाटचाल करत असतांना आज पुन्हा एका व्यापारीचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याला काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने तीन दिवसापूर्वी स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर आज धरणगावात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित व्यापारी वास्तव्यास असलेला खत्री गल्ली परिसर धरणगाव तालुका प्रशासनातर्फे सील करण्याचे काम सुरू आहे. धरणगाव शहरात तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा १२ वर पोहचला आहे. यापैकी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. नागरीकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन न करता घरीच सुरक्षित रहावे असे आवाहन नगरपालिका व तालुका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी प्रशासनाच्या संपर्कात असून संबंधित परिसर निर्जंतुकीकरण करून घेत आहेत.

Exit mobile version