Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : दिल्लीतील हिंसाचार पूर्व नियोजित आणि एकतर्फी ; अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील उत्तर-पूर्व भागात झालेली हिंसा एकतर्फी आणि सुनियोजित असल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या ‘फॅक्ट फाईंडींग’ अहवालातून केला आहे.

दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाच्या दोन पानी अहवालात म्हटलेय की, भाजप नेता कपिल मिश्रा यांनी दिलेल्या चिथावणीखोर भाषणानंतरच हिंसा भडकली. खजुरी खास परिसरातील लोकांनी ही माहिती दिल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच हिंसाचारात सर्वाधिक नुकसान मुस्लीम समुदायाच्या घरांचे आणि दुकानांचे झालेय. हिंसाचाराच्या काळात अधिकाधिक नुकसान करण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला होता. तर घर,दुकान जाळण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात लुटमार झाली. दरम्यान, आयोगाचे या अहवालात दिल्ली पोलिसांचे कौतुक केले आहे.

Exit mobile version