Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : दारूसाठी मोठ्या भावाकडून लहान भाऊचा खून

बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दारु पिण्यासाठी पैसे न दिले नाही म्हणून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन काळे असे या आरोपीचे नाव आहे.

 

माजलगाव तालुक्यात राहणाऱ्या आरोपी गजानन हा आपला लहान भाऊ लक्ष्मण काळे याच्याकडे दारुसाठी पैशाची मागणी करत होता. मात्र लक्ष्मणकडे पैसे नसल्याने त्याने गजाननला पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरुन गजानने धारदार शस्त्राने लक्ष्मणच्या डोक्यात वार केले. त्यात लक्ष्मण यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान गजानन काळेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Exit mobile version