धक्कादायक : कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला कोरोनाग्रस्त पत्रकार होता हजर !

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या एका पत्रकाराला कोरोनाची लागण लागण असल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. ही पत्रकार परिषद २० मार्च रोजी झाली होती तसेच यामध्ये इतर माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.

 

देशभरात कोरोनाचे सावट असताना देखील मध्य प्रदेशामधील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत होते. या दरम्यान मध्य प्रदेशात विविध हालचालींना वेग आला होता. मात्र मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली आणि भाजपाने बाजी मारली होती. याच सत्ता स्थापनेच्या वेळी कमलनाथ अनेकवेळा पत्रकारांशी संवाद साधत होते. याच वेळी एक कोरोना बाधित पत्रकार हजर होता. या पत्रकार परिषदेत केवळ भोपाळचेच नाही, तर दिल्लीतील काही पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काही माजी मंत्री, राजकीय नेते आणि पत्रकारांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच भोपाळमध्ये एका मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तिचे वडील एक पत्रकार आहेत. त्यावरून हे सर्व उघड झाले.

Protected Content