Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : औरंगाबादेत २४ तासात ४३ कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर वाढला असून गेल्या २४ तासात ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांचा आकडा ९५ वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये आज १३ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात ६ जण हे १६ वर्षाखाली आहे. या सर्व रुग्णांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादेमध्ये काल २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज १३ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात ४३ रुग्ण आढळले आहे. दरम्यान, याआधी २५ एप्रिल रोजी औरंगाबादमध्ये २४ तासात सर्वाधिक ७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यात एकाच कुटुंबातील ३ महिलांचा समावेश होता. औरंगबाद शहरात आतापर्यंत १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात जिल्हा रुग्णालयातील १४ तर खासगी रुग्णालयातील २ अशा १६ रुग्णांचा समावेश आहे.

Exit mobile version