Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : ओवेसींच्या व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादचा नारा ( व्हिडीओ )

asaduddin owaisi

बेंगळुरू वृत्तसंस्था । एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या बेंगळुरू येथील सभेत एका तरूणीने पाकिस्तान जिंदाबादचा नारा लावल्याचा व्हिडीओ समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने असदुद्दीन ओवेसी यांच्या बेंगळुरू येथील सभेतील एक व्हिडीओ जाहीर केला आहे. यात ओवेसी हे व्यासपीठावरून जात असतांना एक तरूणी अचानक माईकचा ताबा घेऊन पाकिस्तान जिंदाबाद असे नारे देते. यामुळे धक्का बसलेले ओवेसी हे परत येऊन तरूणीला थांबविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. अर्थात, आपल्या हातातील माईक घट्ट पकडून ती तरूणी पाकिस्तान जिंदाबाद सोबत हिंदुस्तान जिंदाबाद अशी घोषणा देतांना दिसून येत आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी तातडीने या घटनेचा निषेध करून आपण याच्याशी असहमत असून ही तरूणी आपल्याशी संबंधीत नसल्याचे सांगितले आहे. आमच्यासाठी भारत जिंदाबाद होता आणि राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुपारीच एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हा नवीन व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

खालील ट्विटमधील व्हिडीओत वादग्रस्त घोषणा देणारी तरूणी दिसत आहे.

Exit mobile version