Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक: आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थांचा मृत्यू

dead ..........

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी भागातील पिंपरकुंड येथील रहीवासी असलेल्या व लालमाती आश्रमशाळेत पहिलीत शिकणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अजुन अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, लालमाती आश्रम शाळेत इयत्ता पहीलीत शिक्षण घेणाऱ्या राकेश जगन बारेला व आकाश जगन बारेला दोघांचे वय सहा यांना त्यांच्या मोठा भाऊ ५ रोजी त्यांना लालमाती आश्रम शाळेतुन त्यांना त्यांच्या घरी पिंपरकुंड (ता रावेर) येथे घेऊन गेला त्यानंतर ८ रोजी मयत राकेश जगन बारेला याला उलटी झाल्याने त्यांच्या नातलकांनी पाल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व प्राथमिक उपचार करून घरी गेल्या नंतर दि ११ रोजी त्याचा मृत्यू झाला तर त्याचा दुसऱ्या भाऊ मयत आकाश जगन बारेला १८ रोजी याच्या पोटात दुखायला लागल्याने त्याला आश्रम शाळेतील शिक्षकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असतांना रावेर तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

वैद्यकिय अधिकाऱ्यांची भेट
आश्रमशाळेच्या दोघे सख्या मयत भावांच्या पिंपरकुंड (ता.रावेर) येथे रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.एन.डी.महाजन यांनी भेट देऊन मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु कारण समजले नाही. मयत आकाश व राकेशच्या आईवडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी २२ आज रोजी रावेर ग्रामीण रुग्णालयात बोलविण्यात आले आहे.

Exit mobile version