Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : आमदारांची गाडी परिवहन मंत्र्याच्या नावावर ट्रान्सफर(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची गाड़ी चक्क परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याबाबतची तक्रार आ. सावकारे यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे केली आहे.

 

आमदार संजय वामन सावकारे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची( गाडी क्र. एमएच १९ – सी झेड -५१३० ) ही गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतानाही २४ डिसेंबर २०२१ रोजी परस्पर ट्रान्सफर करून परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. याची चौकशी करण्यासाठी आ. सावकारे यांनी आरटीओ कार्यालय गाठले आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसी बोलतांना सागितले की,त्यांना देखील ही बातमी प्रसार माध्यमाद्वारे कळली असून त्याची चौकशी करण्यासाठी ते आरटीओ कार्यालयात आले आहेत. याबाबत खात्री केली असता असा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. यात कागदपत्रे देखील तशी केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याची चौकशी चालू आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, तो होऊ शकला नसल्याने त्यांना यासंदर्भात निरोप देण्यात आल्याचेही आ. सावकारे यांनी सांगितले. शासनाने जी यंत्रणा उभारली आहे त्यात काही त्रुटी असल्यानेच असे प्रकार घडत आहेत. हि यंत्रणा अजून मजबूत करण्यात यावी अशी अपेक्षा आ. सावकारे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांनाही मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी झाली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकारातून आरटीओ कार्यालयाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.या पूर्वी देखील जळगाव आरटीओ कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता असे असतांनाही आतातर चक्क आमदारांच्या मालकीची गाडी जळगाव आरटीओ कार्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करुन नोंदणी केली गेली आहे. पहिल्या गाडी मालकाकडून दुसऱ्याच्या नावावर गाडीची नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जावे लागते. अनिल परब यांच्या नावावर नोंदणी केली तर , ते प्रत्यक्ष आले होते का ? ते जर आले नाही तर त्यांच्या नावावर गाडी ट्रान्सफर होवून नोंदणी झाली कशी ? किंवा पहिल्या गाडी मालकाने गाड़ीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याची एनओसी घेतली होती का ? असे नानाविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

Exit mobile version