Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीचा फायदा घेत अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधमाला पोलीसांनी अटक केली असून अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलीचे आईवडील हे उस तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील चोपडा तालुक्यात उसतोडण्यासाठी गेले होते. त्याठिकाण सागर संजय मोरे (वय-२३) रा. पिंप्री ता. पारोळा याने ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार कुणाला सांगितला जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान पिडील अल्पवयीन मुलगी गर्भवती राहील्याचे आईवडीलांच्या लक्षात आले. त्यांनी अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सागर संजय मोरे (वय-२३) रा. पिंप्री ता. पारोळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेशपुरी बुवा करीत आहे.

Exit mobile version