Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकटी असल्याचे पाहून एकाने वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. साधारण सात महिन्यापुर्वी अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना गावात राहणारो अंदाजे अठरा वर्षीय मुलगा घरात घुसला. तिच्याशी जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर भितीपोटी तिने कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, संधी साधुन संशयित आरोपीने तीन वेळा पुन्हा अत्याचार केला. दसराच्या काळात अल्पवयीन मुलगी ही भाऊसोबत ऊस तोडणीसाठी बारामती येथे गेले होते. १५ दिवसांनंतर मंगरूळ येथे परतले तेव्हा अल्पवयीन मुलगीचे पोटात वाढ झाल्याचे दिसून आले. तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता पिडीत मुलगी ही सात महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर पिडीत मुलीने आपबिती नातेवाईकांसमोर कथन केले. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या नातेवाईकांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.

Exit mobile version