Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“द कश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करावा- युवासेनेचे मागणी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

“द कश्मीर फाइल्स” या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकदेखील भावूक होत आहेत. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी केलेले अमानुष अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पिडीत काश्मिरी पंडितांच्या मुला-मुलींसाठी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यायात प्रवेशासाठी विशेष आरक्षण दिले होते जे आजपर्यंत सुरु आहे. हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त करावे या विषयाचे निवेदन युवासेना जळगाव जळगाव महानगर तर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना देण्यात आले. या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उप-महानगर युवाधिकारी यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवाधिकारी चेतन कापसे, अमोल मोरे, युवासैनिक अमित जगताप शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version