दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । घर बांधकाम करण्यासाठी व दुचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर असलेल्या निशा प्रकाश राठोड (वय-२२) रा. लोणजे तांडा ता.चाळीसगाव यांचा विवाह २९ मे २०२० रोजी प्रकाश भिला राठोड याच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला लहान लहान कारणावरून पती प्रकाश राठोड याने टोमणे व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याप्रमाणे घरातील सासू बनीबाई भिला राठोड, जेठ सुनिल भिला राठोड, जेठाणी ज्योतीबाई सुनिल राठोड आणि दिर रविंद्र भिला राठोड सर्व रा. लोणजेतांडा ता. चाळीसगाव यांनी देखील कोरकोळ करणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पती प्रकाश राठोड यांने घर बांधकाम करण्यासाठी आणि नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्यात.

Protected Content