Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टायर दुकान टाकण्यासाठी विवाहितेला माहेरहुन दोन लाखांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील इस्लामपुरा भागातील माहेर असलेल्या सना वाहिद शेख (वय-२१) यांचा विवाह धुळे येथील शेख वाहिद अलताफ शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती वाहिद याने विवाहितेला टायरचे दुकान टाकण्यासाठी २ लाखांची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून तिचा छळ करण्यास सुरूवात केली. तसेच सारच्या मंडळींनी देखील मानसिक व शारिरीक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. मंगळवारी ३ जानेवारी रेाजी सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती शेख वाहिद शेख अल्ताफ, सासू रेहाना अल्ताफ शेख , जेठ आबीद अल्ताफ शेख , ननंद आसमा मोहसीन शेख, आसमा अल्तमश शेख, अतिक खान आरिु खान, मावस सासू जायदाबी करीम खान सर्व रा. हुडको धुळे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.

 

Exit mobile version