Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन बॅटऱ्यांची चोरी; दोघांवर गुन्हा

 

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खालची अळी भागातील खळ्यातून दोन जणांनी १२ हजार रूपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरत प्रकाश बोंडे (वय-२९) रा. खालची अळी, नशिराबाद ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याचे घराजवळ शेतअवजारे ठेवण्यासाठी खळे आहे. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान खुशबू सुरेश झोपे आणि रविंद्र अशोक पाटील दोन्ही राहणार नशिराबाद ता.जि.जळगाव यांनी बोंडे यांच्या खळ्यातून १२ हजार रूपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याचे उघडकीला आले.

यासंदर्भात मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून खुशबू सुरेश झोपे आणि रविंद्र अशोक पाटील यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे करीत आहे.

Exit mobile version