Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन बकरी चोरांच्या मुसक्या आवळल्या

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तामसवाडी येथून बकरी चोरणार्‍या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पोलिसांनी रात्रगस्त दरम्यान तामसवाडी येथे बकरी चोरून घेऊन जातांना रात्री ०२/०० वाजताचे दरम्यान दोन इसम संशयास्पद स्थितीत दिसून आले. त्यांना ड्युटीवरील पो कॉ अभिजित पाटील, होम गार्ड चेतन पाटील, गोपाळ पाटील यांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

यामुळे या पथकाने शंकर सखाराम भिल ( रा. तामसवाडी) आणि रामकृष्ण रघुनाथ पारधी
( रा. तामसवाडी ) यांना ताब्यात घेतले. याप्रसंगी केलेल्या चौकशीतून त्यांनी तामसवाडी येथीलच दिलबर रमेश मोरे यांची बकरी चोरलेचे कबूल केले. तर, दिलबर मोरे यांना पारोळा पो स्टे येथे बोलावून घेतले असता त्यांनी त्यांचीच बकरी असलेचे खात्रीपूर्वक ओळ्खलेने फिर्यादीचे फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पा ना प्रदीप पाटील करीत आहेत.

Exit mobile version