दोन परप्रांतीय मोबाईल चोरट्यांना ठोकल्या बेड्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात विविध ठिकाणाहून मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून रविवार, १ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन संशयितांना अटक केली आहे, सर्वजित कुमार अर्जून महतो वय २४ , व सनीकुमार महेंदर नोणीया वय २३ दोन्ही रा. नया टोला, कल्यानी, महाराजपुर बाजार, ता . तालझरी, जि. साहेबगंज झारंखंड्यास अशी अटकेतील संशियितांची नावे आहेत.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेवून नागरिकांचे मोबाईल लांबविणाऱ्या संशयितांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम.राजकुमार , अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या होत्या. बाहेरील राज्यातील मोबाईल चोरटे दोन संशयित जळगावातील दाणाबाजारात असल्याची गोपनीय माहिती रविवारी गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते व पोलीस नाईक राजकुमार चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय पोटे, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, गजानन बडगुजर, योगेश पाटील, तेजस मराठे, अमोल ठाकूर, योगेश इंधाटे यांच्या पथकाने दाणाबाजारात सापळा रचून सर्वजित महतो, व सनीकुमार नोणीया दोघांना अटक केली. चौकशीत त्यांच्याकडून ६५ हजारांचे गळया कंपनीचे महागडे असे एकूण ६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. यातील एक मोबाईल चोरीप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर हे करीत आहेत.

Protected Content