Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अजिंठा चौकातून भुपेश प्रकाश कुळकर्णी (वय-३८) रा. देवेंद्र नगर जळगाव हा दुचाकी (एमएच १९ बीब ७७७) ने त्याच्या मित्र संतोष डांबरे यांच्या सोबत जात असतांना समोरून येणारी भरधाव अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिली. तयात भुपेश कुळकर्णीसह त्याचा मित्र संतोष डांबरे हे दोघे जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात भुपेश कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Exit mobile version