Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तरूण ठार

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना चांगदेव गावाजवळील वढवे फाट्यासमोर घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शिवाजी पाटील (वय-३५, रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप शिवाजी पाटील हा तरुण १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता त्याचा मित्र तुषार प्रमोद पाटील यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके ८९६२) ने दुचाकीने जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे फाट्यासमोर रामदास महाराज यांच्या शेतासमोर समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ -१५१) वरील चालक पंकज वंजारी यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप शिवाजी पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मागे बसलेला तुषार पाटील हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर दुचाकीधारक हा दुचाकी घेऊन पसार झाला होता. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पंकज वंजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेडे करीत आहे.

Exit mobile version