दोन डोस शिवाय महाविद्यालयात प्रवेश नाही

जळगाव, प्रतिनिधी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दीर्घकाळ बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबर रोजी सुरू झाल्या आहेत. यानंतर आता  २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असून दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे परिपत्रक राज्य शासनाने आज १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले आहे.

 

राज्यातील महाविद्यालयांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगळी नियमावली असेल परिस्थिती पाहून ते ठरवले जाणार आहे.  मात्र विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधकारक करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही अथवा एकच डोस झाला आहे त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्याचे देखील सूचित करण्यात आले आहे. ५० टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती संदर्भात अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य होणार नाही त्यांच्या ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

Protected Content