Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन जणांना चौघांकडून लोखंडी रॉडने मारहाण

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील गंजेवाडा येथे अंगणात दुचाकी लावण्याच्या कारणावरून दोन जणांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी भडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, साहेबराव मुरलीधर गंजे (वय-४४) रा. गंजेवाडा भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १० मार्च रोजी रात्री १० वाजता अंगणात दुचाकी लावण्याच्या कारणावरून साहेबराव गंजे व त्यांचा भाऊ युवराज मुरलीधर गंजे यांना शेजारी राहणारे विठोबा बळीराम मिस्तरी, मधुकर बळीराम मिस्तरी, किशोर अरूण मिस्तरी आणि गजू अशोक मिस्तरी चौघे रा. भडगाव यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. भडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर साहेबराव मुरलीधर गंजे यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून १३ मार्च रोजी रात्री उशीरा भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी  विठोबा बळीराम मिस्तरी, मधुकर बळीराम मिस्तरी, किशोर अरूण मिस्तरी आणि गजू अशोक मिस्तरी चौघे रा. भडगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर करीत आहे.

Exit mobile version